Nandurbar | नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार मारणार; ग्रामस्थ हवालदिल
बर्ड फ्लूचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात आढळून आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
बर्ड फ्लूचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात आढळून आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम संबंधित पोल्ट्री फार्मचे पंचनामे करण्यात येत असून त्यानंतर ‘क्लिंजिंग’ (नियंत्रणासाठी पक्ष्यांचे नष्टीकरण) प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, या परिसरात सुमारे 27 पोल्ट्री फार्म असून, जवळपास 12 लाखांहून अधिक पक्षी आणि सुमारे 8 लाख अंडी असल्याची माहिती समोर आली आहे. या अंड्यांची वाहतूक गुजरात तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये केली जाते.
दरम्यान, संशयित नमुने भोपाल येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 1 किलोमीटर परिसरातील सर्व पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे नष्टीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Published on: May 02, 2026 01:26 PM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

