लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल, प्रत्येक 13 हजार… नेमकं काय घडलं?
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच नागपूरातील भाजप नगरसेवकांनी मुंबईतील पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी स्वतःच्या खिशातून खर्च उचलल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाकडून 13 हजार रुपये गोळा करण्यात आले आहेत.

15 आणि 16 तारखेला मुंबईत भाजपकडून दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नगरसेवकांचा प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्च त्यांच्या मानधनातूनच करण्यात येत आहे. पक्षाने सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्यावर विशेष भर दिला आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत लाखो रुपयांच्या प्रलोभनांच्या चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून भाजपवर घोडेबाजाराचे आरोप केले जात असतानाच भाजपने आपल्या लोकप्रतिनिधींना संघटनात्मकदृष्ट्या मजबूत ठेवण्यासाठी स्वखर्चाचा मार्ग स्वीकारल्याचे बोलले जात आहे.
या निर्णयामुळे भाजपने ‘पार्टी विथ डिफरन्स’ ही आपली प्रतिमा पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Published on: Jun 09, 2026 02:01 PM
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल,
मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांचा अर्ज...
राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा