Tushar Bhosale on Sharad Pawar | दगडूशेठ गणपतीला जायचं होतं तरी शरद पवारांनी नॉनव्हेज खाललं
पवार यांना आपल्याला बाप्पाचं दर्शन घ्यायच आहे माहिती असताना देखील मासं कसं खालं असा सवाल केला आहे. तसेच त्यांना पुन्हा नासतीक म्हटले आहे. तर यावरून शरद पवार यांना मौलाना म्हणत आज त्यांचा जुम्मा होता
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र, पवारांनी बाप्पाचं दर्शन बाहेरुनच घेतल्यानं पुन्हा एकदा चर्चेला ऊत आलाय. मात्र, पवार यांनी मांसाहार (Non Veg) केल्यानं ते मंदिरात गेले नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं. पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर भाजपच आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले पवार यांना आपल्याला बाप्पाचं दर्शन घ्यायच आहे माहिती असताना देखील मासं कसं खालं असा सवाल केला आहे. तसेच त्यांना पुन्हा नासतीक म्हटले आहे. तर यावरून शरद पवार यांना मौलाना म्हणत आज त्यांचा जुम्मा होता असं म्हटलं आहे.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर

