गजनी सिनेमा पाहावा, आशिष शेलार यांनी का दिला सुप्रिया सुळे यांना असा सल्ला?
भाजपवर आरोप करणाऱ्यांनी तोंड बंद करावीत, अन्यथा... आशिष शेलार यांनी दिला काय दिला इशारा?
भाजप सुडाचं राजकारण करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देत भाजप नेते आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी आशिष शेलार यांनी मविआमध्ये काय काय घडले, याची यादीच वाचून दाखवली, मविआच्या काळात सामान्य नागरिकांचे जाहीर मुंडन केलेत. आज जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पण त्यावेळी महापौरांनी माझ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, अशी अनेक प्रकरणे कुणी केली? असा सवाल उपस्थित करत गजनी सिनेमा बघा, म्हणजे तुम्हाला सगळं आठवेल, पण तसा विसरण्याचा आजार होऊ नये, असे म्हणत शेलारांनी खोचक टोलाही लगावला आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, भाजपवर आरोप करणाऱ्यांनी तोंड बंद करावीत, अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न नेमका कोण करत होतं, मी हे नावासहित उघड करेन असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला आहे.
Published on: Jan 26, 2023 02:55 PM
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
