Maharashtra Politics: पंकजा मुंडे BRSची ऑफर स्वीकारणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया
बीआरएसने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तर मुंडे यांना बीआरएसने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात अनेक राजकीय हालचाली होत आहेत. त्यातच राज्याच्या राजकारणात बीआरएस पक्षाने एन्ट्री घेतली आहे. ज्यात आता काही माजी आमदार आणि खासदारांनी प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. याचदरम्यान बीआरएसने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तर मुंडे यांना बीआरएसने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर या ऑफरवर भाजप नेते, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाईत असल्याचं म्हणत महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये देखील बीआरएसचा मुख्यमंत्री होणार नाही असं म्हटलं आहे. तसेच बीआरएसने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. तर पंकजा मुंडे राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. ते या ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत, असा आशावादही त्यांनी यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Jun 24, 2023 03:16 PM
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
