Nitesh Rane Video : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंची नवी मागणी अन् थेट शिक्षणमंत्र्यांना पत्र
नितेश राणे यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसेंना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी बुरखा घालून परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींना प्रवेश नको, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांकरता काहीच दिवस विद्यार्थ्यांच्या हातात आहेत. त्यामुळे विद्यार्थी करत असलेला सराव आणि त्यांची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. बारावीची परीक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती ११ मार्च पर्यंत असणार आहे. तर येत्या २१ फेब्रुवारीपासून ते १७ मार्चपर्यंत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. दरम्यान, या परिक्षांसाठी वेळापत्रकापासून ते हॉलतिकीट आणि परिक्षा केंद्र या सर्वांचं नियोजन झालं असताना परिक्षा सुरू असताना होणाऱ्या कॉपी संदर्भात भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी एक मोठी मागणी केली आहे. नितेश राणे यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसेंना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी बुरखा घालून परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींना प्रवेश नको, अशी मागणी केली आहे. ‘बुरखा घातल्याने तिच विद्यार्थी परिक्षेसाठी आली आहे की नाही.. हे असे प्रकार समोर येतात. म्हणून अशा प्रकारचे लांघुनचालन कोणाचे करू नये’, असं स्पष्टपणे नितेश राणे यांनी म्हटलंय. ‘इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेस परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी, तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास तपासणीसाठी महिला पोलीस अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी’, असे नितेश राणे यांनी पत्राद्वारे देखील म्हटले आहे. बघा व्हिडीओ नितेश राणे काय म्हणाले?
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

