Nitesh Rane Video : आलमगीर औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, ‘ही घाण…’
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. नुकतीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत मोठी मागणी केली. यानंतर औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यभरात आलमगीर औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. आलमगीर औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात हिंदुत्ववादी संघटना आणि बंजरंग दलासह विश्व हिंदू परिषद चांगलेच आक्रमक झाले आहेत. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचेही काही नेते मागणी करत असताना भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी संताप व्यक्त करत औरंगजेबाच्या कबरीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘हिंदुत्व विचाराचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन शिवजंयती साजरी करण्यासाठी जमले आहोत. सगळ्यांची एकच भावना आहे की, २१ फेब्रुवारीला जशी शिवजयंती साजरी होते तशीच आजची पण व्हावी’, असे राणे म्हणाले. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरूनही भाष्य केले. ‘आमच्या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आहे ती आठवण आम्हाला नकोच आहेत. आज प्रत्येक हिंदू अस्वस्थ आहे ज्याने महाराजांना हाल करून मारलं त्याची कबर महाराष्ट्रात नको. काहींना ती आठवण म्हणून वाटते पण ती घाण आम्हाला नकोय’, अशी भावना राणेंनी व्यक्त केली.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?

