Manoj Jarange Patil : मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करायचंय? राज्य सरकारचे ‘हे’ नियम पाळावेच लागणार
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक असते. त्यामुळे आझाद मैदानावर आंदोलनासाठी आंदोलकाला सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमातील अटी-शर्तींची पूर्तता आंदोलकांना करावी लागणार आहे, असे महत्त्वाचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, येत्या २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार […]
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक असते. त्यामुळे आझाद मैदानावर आंदोलनासाठी आंदोलकाला सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमातील अटी-शर्तींची पूर्तता आंदोलकांना करावी लागणार आहे, असे महत्त्वाचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, येत्या २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार होते. मात्र या आंदोलनापूर्वीच मुंबई हायकोर्टाकडून मनोज जरांगे पाटलांना मोठा दणका देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील वर्दळ, गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई हायकोर्टाने एक मोठा निर्णय घेत मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानात येऊन आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आदेशामागे कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच आंदोलनामुळे सामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश आहे. यापुढे आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कोणत्याही गटाला किंवा व्यक्तीला या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

