VIDEO : Case Registered Against MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईंकावर गुन्हा दाखल
भाजपा नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर गणेश नाईक यांनी झालेल्या अपत्याचा स्वीकार केला नाही.
भाजपा नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर गणेश नाईक यांनी झालेल्या अपत्याचा स्वीकार केला नाही. यासंबंधी पीडितेने तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या या तक्रारीनुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत.
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे

