AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय; चांदीच्या आयातीवरील नवे निर्बध काय?

मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय; चांदीच्या आयातीवरील नवे निर्बध काय?

| Updated on: May 17, 2026 | 12:43 PM
Share

केंद्र सरकारने चांदीच्या आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 99.9 टक्के शुद्ध चांदीच्या आयातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. सरकारने तात्काळ प्रभावाने या प्रकारच्या चांदीच्या आयातीवर बंदी लागू केली असून, आता चांदी आयात करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

केंद्र सरकारने चांदीच्या आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 99.9 टक्के शुद्ध चांदीच्या आयातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. सरकारने तात्काळ प्रभावाने या प्रकारच्या चांदीच्या आयातीवर बंदी लागू केली असून, आता चांदी आयात करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे चांदीची आयात ‘मुक्त श्रेणी’तून थेट ‘प्रतिबंधित श्रेणी’मध्ये गेली आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरून वाढवत 15 टक्के केले होते. त्यानंतर आता चांदीच्या आयातीवर आणखी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामागे वाढत्या आयातीवर नियंत्रण ठेवणे, देशांतर्गत बाजारपेठेतील संतुलन कायम राखणे आणि परकीय चलनावर येणारा ताण कमी करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या निर्णयाचा परिणाम चांदी व्यापार, दागिने उद्योग आणि गुंतवणूकदारांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चांदीच्या आयातीसाठी आता अधिकृत परवानगीची अट लागू झाल्याने बाजारात चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Published on: May 17, 2026 12:43 PM
Follow Us