AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?

मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच… दिल्लीत नेमकं काय घडतंय?

| Updated on: Oct 16, 2026 | 1:33 PM
Share

दिल्लीतील सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीच्या तिरंगा रॅलीसाठी केवळ 11 जणांना प्रवेशास परवानगी मिळाली आहे. मोठ्या आंदोलनाच्या शक्यतेने पोलिसांनी सेंट्रल पार्क सामान्य नागरिकांसाठी बंद केले असून, कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अभिजीत दिपके यांनी या निर्बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दिल्लीतील सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीद्वारे आयोजित तिरंगा रॅलीला दिल्ली पोलिसांनी कठोर निर्बंध घातले आहेत. मोठ्या संख्येने लोक जमू नयेत या उद्देशाने पोलिसांनी केवळ 11 आंदोलकांना सेंट्रल पार्कमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. सीजेपीचे अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवण्याचा पवित्रा घेतला होता. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, तिरंगा फडकवण्यास त्यांचा कोणताही विरोध नाही, परंतु आंदोलनाच्या नावाखाली सेंट्रल पार्कमध्ये गर्दी करून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

या पार्श्वभूमीवर, आज संध्याकाळी पाच वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती दिपके यांनी दिली होती, परंतु त्यांना अटकेची शक्यताही वर्तवली होती. सुरक्षेच्या दृष्टीने सेंट्रल पार्क आज आणि उद्या सामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. पार्कमधील सर्व गेट्सवर बॅरिकेडिंग करून रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Published on: Oct 16, 2026 01:33 PM

Follow Us