VIDEO | ‘वैफल्यग्रस्त ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच बोरूबहाद्दराने गरळ ओकली’; सामन्याच्या टीकेवर बावनकुळे यांची जहरी टीका
ठाकरे गटाच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ही टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हीरी लागली आहे.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | दैनिका सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना, ते आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण मुख्य चा ‘उप’ झाल्याने ते वैफल्यात गेलेत. त्यांची संवेदनशीलता संपल्याने ते अहंकाराचे महामेरू बनले आहेत. तर फडणवीस यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेची असून ते अर्धग्लानी अवस्थेत आहेत. तर एका चांगल्या माणसाच्या झोकांड्या जात आहेत. फडणवीस, सांभाळा! अशी टीका करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आता आक्रमक झाले आहेत. तर आमदार राम कदम यांनी ट्विट करत यावरून जोरदार टीका केली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ट्विट करत खासदार राऊत आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. पाहा काय म्हटलं आहे बावनकुळे यांनी….
Published on: Aug 19, 2023 11:57 AM
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
