AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी

CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी

| Updated on: Oct 14, 2026 | 5:14 PM
Share

दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बंदी असतानाही त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला.

दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीजेपी (CJP) या संघटनेचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल सकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची कोठडी दिली.

बंदी असतानाही या दोन्ही नेत्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांसह जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी बसमध्ये बसवल्यानंतर रांका आणि दास यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. यावेळी बोलताना, जर मोदी आणि शाह यांना असे वाटत असेल की पाच दिवस तुरुंगात पाठवल्याने आम्ही घाबरू, तर ते चुकीचे आहे. आम्ही घाबरणार नाही आणि या हुकूमशाही सरकारचा अंत करूनच राहू, असे दास आणि रांका यांनी म्हटले. तिरंगा फडकवला म्हणून अटक झाली असेल तर कुठे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Published on: Oct 14, 2026 05:14 PM

Follow Us