Uttarkashi Cloud Burst Video: उत्तरकाशीत मोठी ढगफुटी, घरांसह माणसं गेली वाहून; बघा धडकी भरवणारा VIDEO
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एनडीआरएफसह सर्व मदत यंत्रणा बचाव कार्यात गुंतल्या आहेत. अनेक घरे आणि हॉटेल्स उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक (०१३७४-२२२१२६, २२२७२२, ९४५६५५६४३१) जारी केले आहेत.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथून एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. येथील हर्षिलमध्ये ढग फुटल्याने प्रचंड मोठं नुकसान झाले. ६० लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर कित्येक लोकं ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचेही वृत्त आहे. या अपघातात आतापर्यंत नेमका किती जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी १०० हून अधिक लोक तिथे अडकले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ढग फुटल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये अवघ्या २० सेकंदात सर्व काही कसे उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये अचानक ढगफुटी झाल्यानंतर लोक ओरडताना दिसताय. या घटनेनंतर उत्तराखंड आपत्तीबाबत आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. गढवालच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. यामध्ये मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाले आहेत. भटवाडी येथील एसडीआरएफ पथकही धाराली येथे रवाना झाले आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

