एकनाथ शिंदे रॉकेट, फडणवीस सुतळी बॉम्ब, ठाकरे राऊत कोण, कुणी फोडले राजकीय फटाके?
जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावतीने हास्य दीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी राजकीय फटाके फोडले. खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना त्यांनी उपमा दिलीय.
जामनेर | 18 नोव्हेंबर 2023 : जळगावातील जामनेर येथे हास्य दीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हास्य जत्राचे कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांनीही उपस्थिती लावली होती. अभिनेता डॉ. निलेश साबळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना काही प्रश्न विचारले त्याला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी राजकीय फटाके फोडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुतळी बॉम्ब आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॉकेट आहेत असे मंत्री महाजन म्हणाले. तडतड करणारा फुलबाजा म्हणजे संजय राऊत आणि दोन्हीकडे हात ठेवणारे डबलबार म्हणजे उद्धव ठाकरे अशी उपमा त्यांनी या नेत्यांना दिली.

पिवळ्या साडीमधील ही अभिनेत्री कोण? दिसते या अभिनेत्री सारखी...

मोरपंखामुळे दूर होतो वास्तूदोष हे उपाय करा

आमना शरीफचा लहंगा लुक्स, फोटो पाहून चाहते आकर्षित

ये...लय होतंय हा शीतले, शिवानी बावकरच्या लुकवर चाहते...

गोल्डन साक्षी, अभिनेत्रीचं देखणं रुप पाहून चाहते घायाळ

तेलंगणाच्या विजयाचे शिलेदार रेवंत रेड्डी; काँग्रेस हाय कमांडच्या भेटीला
Latest Videos