AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाराजीच्या सुरावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचं उत्तर; म्हणाले मी नाराज...

नाराजीच्या सुरावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचं उत्तर; म्हणाले मी नाराज…

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Mar 29, 2023 | 8:05 AM
Share

काँग्रेस आणि भाजपकडून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी त्यांची भूमिका मांडली.

कोल्हापूर : सध्या राज्यासह देशात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. काँग्रेस आणि भाजपकडून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी त्यांची भूमिका मांडली. यावेळी त्यांच्यावर अमोल कोल्हे नाराज या सतत होणाऱ्या प्रश्नाबद्दल विचारला असता त्यावरही त्यांनी माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसते का असा प्रतिसवाल पत्रकारांना केला.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेले खासदार कोल्हे यांना त्यांच्या नाराजीवर प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी मी नाराज नाही असे सांगितलं. तर नियोजित कार्यक्रमामुळे राजकीय कार्यक्रमांना अनुपस्थित असतो असाही खुलासा कोल्हे यांनी केला. तर यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील पिंपरी चिंचवडमध्ये स्पष्टीकरण दिल्याचे ते म्हणाले. तर काही कलेची कमिटमेंट असेल कलाक्षेत्राची काही कमिटमेंट असेल, नाटकाचा प्रयोग असेल तर त्यावेळी कदाचित राजकीय कार्यक्रमासाठी मी अनुपस्थित असतो. मात्र लगेच हेडलाईन सुरू होते अमोल कोल्हे नाराज. पण असं काही नाही… मी नाराज नाही.

Follow Us