AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेलू-नेरळदरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत; उद्यान एक्सप्रेससह अनेक गाड्या अडकल्या

शेलू-नेरळदरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत; उद्यान एक्सप्रेससह अनेक गाड्या अडकल्या

| Updated on: May 29, 2026 | 11:05 AM
Share

मध्य रेल्वेच्या शेलू-नेरळ स्थानकादरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडाचा परिणाम डाऊन मार्गावरील अनेक गाड्यांवर झाला असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

मध्य रेल्वेच्या शेलू-नेरळ स्थानकादरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडाचा परिणाम डाऊन मार्गावरील अनेक गाड्यांवर झाला असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरळ स्थानकाजवळ धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे उद्यान एक्सप्रेससह कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबून राहिली आहे.
दरम्यान, कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वेकडून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने स्टेशन परिसरात प्रवाशांची गर्दी वाढली असून अनेक प्रवासी रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. मध्य रेल्वेकडून प्रवाशांना सहकार्य करण्याचं आणि अद्ययावत माहितीसाठी अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

 

Published on: May 29, 2026 11:05 AM

Follow Us
सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!.

सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड.

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड

अजितदादांच्या पक्षाला मोठा धक्का? राजीनामा पडणार? महिला नेत्याच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ!.

अजितदादांच्या पक्षाला मोठा धक्का? राजीनामा पडणार? महिला नेत्याच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ!

Sonam Wangchuk : अंत पाहू नका…अण्णा हजारेंचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारला थेट इशारा!.

Sonam Wangchuk : अंत पाहू नका…अण्णा हजारेंचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारला थेट इशारा!

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर, ‘श्रीकांत’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान, पाहा संपूर्ण यादी.

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर, ‘श्रीकांत’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान, पाहा संपूर्ण यादी

FIFA World Cup 2026 जेतेपद अर्जेंटीनाला मेस्सी नाही तर हा खेळाडू मिळवून देणार, 100 टक्के विजयाची हमी.

FIFA World Cup 2026 जेतेपद अर्जेंटीनाला मेस्सी नाही तर हा खेळाडू मिळवून देणार, 100 टक्के विजयाची हमी