AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचावले २२८ प्रवाशी

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचावले २२८ प्रवाशी

| Updated on: Apr 26, 2026 | 11:41 AM
Share

288 प्रवाशांनी भरलेल्या विमानाची मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. विमानतळावरच या विमानाला आग लागली आहे. मात्र, दैवबलवत्तर म्हणून मोठी हानी टळली.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. विमानाला टेक ऑफ घेण्यासाठी अवघा काही वेळ बाकी असतानाच विमानाला आग लागली. त्यामुळे एकच घबराट पसरली. पण विमानतळ प्रशासनाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. जर विमानाने उड्डाण घेतलं असतं आणि ही घटना घडली असती तर भयंकर दुर्घटना घडली असती. विमानात एकूण 228 प्रवासी प्रवास करत होते. या सर्वांचा जीव धोक्यात आला असता.

मिळालेल्या माहितीनुसार, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सचे LX147 हे विमान दिल्लीहून झुरिचला रवाना होणार होते. विमान धावपट्टीवर टेकऑफच्या प्रक्रियेत असतानाच एका इंजिनमध्ये बिघाड झाला आणि आग लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तात्काळ टेकऑफ रद्द केले आणि तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्याचे (Emergency Evacuation) आदेश दिले. या घटनेत 6 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published on: Apr 26, 2026 11:41 AM
Follow Us