AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा

दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट… मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा

| Updated on: Oct 14, 2026 | 8:40 AM
Share

सीजीपीच्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, कालीघाट येथे दुर्गा पूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात असताना एका अज्ञात महिलेने ममता बॅनर्जींवर गैरवर्तन केल्याचा आणि हल्ला केल्याचा प्रयत्न केला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिल्लीत सीजीपीच्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंतर-मंतरवर बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. दुसरीकडे,  एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ममता बॅनर्जी यांच्यावर एका अज्ञात महिलेने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. खासदार डोला सेन यांनी या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कालीघाट येथील दुर्गा पूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात असताना ममता बॅनर्जी यांच्याशी एका अज्ञात महिलेने गैरवर्तन केले आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बेलेघाटाचे आमदार आणि ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहयोगी कुणाल घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी रस्त्यावरून पायी जात असताना ती महिला अचानक त्यांच्यासमोर आली. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Published on: Oct 14, 2026 08:40 AM

Follow Us