AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस

मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून… थेट बजावली नोटीस

| Updated on: Oct 15, 2026 | 1:35 PM
Share

दिल्लीतील आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद ठेवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने सरकारवर नाराजी व्यक्त करत उत्तर मागवले होते. दिल्ली पोलिसांनी बिनशर्त माफी मागितल्याचे केंद्राने सांगितले, मात्र न्यायमूर्ती बागची यांनी याला सशर्त माफी असे संबोधत असमाधान व्यक्त केले.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद ठेवल्याप्रकरणी दाखल झालेल्या अवमान याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. न्यायालयाने यापूर्वीच सरकारवर नाराजी व्यक्त करत मेट्रो आणि रेल्वे का बंद ठेवल्या, याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल युक्तिवाद करत आहेत. याचिकेनुसार, सर्वोच्च न्यायालयाने लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून मेट्रो बंद न करण्याचे निर्देश दिले होते.

तरीही सेवा खंडित करण्यात आल्या, त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारने कोर्टात सांगितले की, 303 मेट्रोपैकी केवळ 45 मेट्रोचे एंट्री-एक्झिट पॉईंट बंद केले होते. सुनावणीदरम्यान, दिल्ली पोलिसांनी बिनशर्त माफी मागितल्याचे केंद्र सरकारने नमूद केले. मात्र, न्यायमूर्ती बागची यांनी या माफीला सशर्त संबोधत असमाधान व्यक्त केले. “तुमच्या युक्तिवादामुळे ती सशर्त माफी बनली आहे,” असे न्यायमूर्ती बागची यांनी टिप्पणी केली. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Published on: Oct 15, 2026 01:35 PM

Follow Us