मतदार यादी बदलाचे आरोप! काय म्हणाले देवांग दवे?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे देवांग दवे यांच्यावर मतदार यादीत घोळ घालण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटचे कंत्राट घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. देवांग दवे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, निवडणूक आयोगाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मतदार याद्यांमध्ये नावे डिलीट करणे आणि बनावट नावे ॲड करून घोळ घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप युवा नेते देवांग दवे यांचे नाव घेतले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटचे कंत्राट देवांग दवे यांना मिळाले असून, तेच मतदार याद्यांमध्ये नावे टाकणे किंवा डिलीट करण्याचे काम करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, देवांग दवे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका अंतर्गत चौकशीतही आपल्याला क्लीन चिट मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Published on: Oct 16, 2025 11:12 AM

