पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चा! वळसे पाटील आणि शरद पवरांच्या सिलव्हर ओकवरील बैठकीत… राजकारणात काहीतरी मोठं घडणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीत कांद्याच्या दराचा प्रश्न, सहकार विभागातील विविध विषय तसेच राज्यातील अनेक सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या भेटीला राजकीय महत्त्व दिले जात असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांनाही पुन्हा जोर आला आहे.
याआधीही अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यात आता दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीची भर पडली आहे. वळसे पाटील हे शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट आणि वाय. बी. चव्हाण सेंटरसारख्या संस्थांमध्ये अजूनही सक्रिय सदस्य आहेत. त्यामुळे ही भेट कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीवर झालेली नसून सामाजिक आणि विविध विषयांवरील चर्चेसाठीच
Published on: Jun 04, 2026 11:18 AM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...