Video | मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत…
पुण्यातील नऱ्हे पोलिस चौकीत दारुच्या नशेत आलेल्या महिलेने मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. संबंधित महिला पोलिस चौकीत आल्यानंतर मोठ्याने आरडाओरड करत होती. तसेच तिने उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ केल्याचेही सांगितले जात आहे.

यावेळी चौकीत उपस्थित असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांनी संयम राखत महिलेला शांतपणे तिची तक्रार मांडण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही महिलेचा गोंधळ सुरूच राहिला. ती पोलिसांशी अरेरावी करत असल्याने चौकीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
महिलेची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. अखेर महिला पोलिसांनी तिला हे सरकारी कार्यालय असून येथे अशा प्रकारचा धिंगाणा करु नका हे तुमचं घर नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तरीही तिच्या वागण्यात कोणताही बदल दिसून आला नाही.
या प्रकारामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर संबंधित महिलेविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
Published on: May 31, 2026 02:29 PM
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा