AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स

E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स

| Updated on: Jul 27, 2026 | 1:57 PM
Share

E-20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात सुरू करण्यात आलेल्या E-20 जनता पार्टीच्या डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं आहे. या मोहिमेला अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, E-20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गेल्या 24 तासांत दोन लाखांहून अधिक नवीन फॉलोअर्स जोडले गेले आहेत. तसेच, एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत खात्याचा फॉलोअर्सचा आकडाही 50 हजारांच्या पुढे गेला असल्याचं सांगण्यात येत आहे.

E-20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात अनेक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहीम सुरू केली असून, या इंधनामुळे वाहनांचं मायलेज कमी होत असल्याचा आणि इंजिनवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप अनेक वाहनधारकांकडून केला जात आहे.

दरम्यान, E-20 इंधनाबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, या विषयावर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. तथापि, वाहनांच्या कार्यक्षमतेवर E-20 इंधनाचा परिणाम आणि नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Published on: Jul 27, 2026 01:57 PM

Follow Us