एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग
नवी दिल्लीतील आयटीओ (ITO) परिसरातील विकास मार्गावर असलेल्या शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग मंत्रालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली असून घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
नवी दिल्लीतील आयटीओ (ITO) परिसरातील विकास मार्गावर असलेल्या शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात अचानक आग लागली. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली असून घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, आग दुसऱ्या मजल्यावरील एका विभागात लागली होती. धूर मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे इमारतीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Published on: Jun 01, 2026 12:12 PM
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान

