AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan : शिवसेना माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांवर जीवघेणा हल्ला, गाडीचाही केली तोडफोड; कल्याणामध्ये खळबळ, घडलं काय?

Kalyan : शिवसेना माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांवर जीवघेणा हल्ला, गाडीचाही केली तोडफोड; कल्याणामध्ये खळबळ, घडलं काय?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Oct 18, 2025 | 10:57 AM
Share

कल्याणमध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. बोरगावकरांनी एका हाणामारीत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात त्यांची गाडी तोडण्यात आली असून, एक जण गंभीर जखमी होऊन मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

कल्याणमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत बोरगावकरांसह आणखी दोन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, उमेश बोरगावकरांनी एका हाणामारीत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ओंकार नामक एका तरुणाला डोक्याला मार लागून रक्त आले होते. या घटनेनंतर ओंकारला उपचारांसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले होते.

उपचार आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करून बोरगावकर आणि त्यांचे सहकारी रुग्णालयातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर चारी बाजूंनी हल्ला करण्यात आला. मुलांच्या घोळक्याने त्यांची गाडी तोडली आणि बोरगावकरांवरही हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेने खळबळ उडाली आहे.

Published on: Oct 18, 2025 10:57 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या