‘शिंदे यांना नक्षलांकडून संपवण्याचा कट होता, मात्र त्यावेळी ठाकरे यांनी…’; शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
गायकवाड यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाचा किस्सा सांगत हा आरोप केला आहे.
बुलढाणा, 17 जुलै 2023 | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आता शिंदे गटातील काही आमदारांनी आरोप केले आहेत. त्यातीलच मोठा आरोप करताना शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी गायकवाड यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाचा किस्सा सांगत हा आरोप केला आहे. त्यांनी शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षल्यांनी दिली होती. त्यावेळी शिंदेंना जाणून बुजून नक्षलग्रस्त जिल्ह्याचा पालकमंत्री बनविण्यात आलं होतं. तर नक्षलवाद्यांकडून शिंदेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर सरकारने त्यांना झेड संरक्षण देण्याचं ठरवलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना संरक्षण देऊ नका असं गृह मंत्रालयाला फोन करून सांगितल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर संभाजी राजेंच्या घरात बैठक चालू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा द्यायची नाही असा आदेश दिला होता. एकप्रकारे शिंदे यांना नक्षल्यांकडून संपवण्याचे कट शिजला होता असा दावा गायकवाड यांनी केला आहे.
Published on: Jul 17, 2023 08:10 AM
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांचं उत्तर
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
