Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर…
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 5 वर टापरी-चोलिंग परिसरात सतलज नदीवरील ‘बेली ब्रिज’ अचानक कोसळल्याने एक अवजड डंपर थेट नदीत पडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खडी आणि वाळूने भरलेला एक डंपर पुलावरून जात होता. हा डंपर क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. डंपर पुलाच्या मध्यभागी पोहोचताच पुलाला मोठा हादरा बसला आणि काही क्षणांत संपूर्ण पूल कोसळला. त्यानंतर डंपरसह पुलाचा मोठा भाग सतलज नदीत वाहून गेला.
घटनेनंतर प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुल कोसळल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांकडून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Published on: Jun 24, 2026 12:42 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी