Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचं मन तळ्यात- मळ्यात, देवेंद्र फडणवीस मात्र गळ्यात
भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी वर्सोवा मतदारसंघात मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात मंगळागौरचा आनंद घेतला.
मुंबई । 12 ऑगस्ट 2023 : अमृता फडणवीस यांची एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे, त्या एक गायिका देखील आहेत, पती देवेंद्र फडणवीस राजकारणात असल्याने त्या नेहमी आपल्या बिनधास्त वक्तव्याने चर्चेत असतात. अर्थात देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांना तेवढंच समजून घेत असावेत. मुंबईत मंगळागौरच्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीस या नऊवारी नेसून आल्या होत्या. त्या जेवढ्या सुंदर दिसत होत्या, तेवढाच सुंदर उखाणा देखील त्यांनी घेतला. अर्थातच या उखाण्यातून त्यांचे पती देवेंद्र फडणवीस हे सुटणार कसे, पाहा, अमृता फडणवीस यांनी नेमका कोणता उखाणा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि मंगळागौर कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिली. स्त्रीशक्तीचा जागर या ठिकाणी होतोय. महिला सक्षमीकरण या माध्यमातून होतंय याचा मला आनंद आहे, असं म्हणत त्यांनी एक मजेशीर उखाणा घेतला.
Published on: Aug 12, 2023 10:08 PM
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
