chandani chowk Bridge : पुणे मेट्रोचा प्रस्ताव नागपूरचा आधी, पण नागपूरला का आधी झाली मेट्रो, फडणवीस यांनी सांगितले कारण

Pune chandani chowk Bridge : पुणे शहरातील चांदणी चौक पुलाचे लोकार्पण शनिवारी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या आधी नागपूर मेट्रो का झाली, हे कारण सांगितले.

chandani chowk Bridge : पुणे मेट्रोचा प्रस्ताव नागपूरचा आधी, पण नागपूरला का आधी झाली मेट्रो, फडणवीस यांनी सांगितले कारण
devendra fadnavisImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 2:45 PM

योगेश बोरसे, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील चांदणी चौकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी झाला. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराचा विकासाचा आराखडा मांडला. तसेच पुणे मेट्रोच्या आधी नागपूर मेट्रो का झाली? कोणत्या कारणामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प रखडला, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे विमानतळाचे काम दहा वर्षांआधी झाले असता तर पुण्याचा विकास दर अधिक असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मेट्रो प्रकल्प का रखडला

पुणे हे बुद्धिवंतांचे शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे पुण्यात निर्णय घेताना दमछाक होते. मेट्रोसंदर्भात असेच झाले. पुणेकर एका प्रस्ताववर समाधानी होत नाही. एक प्रस्ताव आणला तर दुसऱ्या देशातील आणखी प्रस्ताव येतो. मग आणखी नवी प्रस्ताव येतो. यामुळे पुणे मेट्रोचा प्रस्ताव रखडला गेला. परंतु पुण्याच्या नंतर नागपूर मेट्रोसंदर्भात प्रस्ताव आला. त्यानंतर नागपूर मेट्रो पूर्ण झाली. परंतु पुणे मेट्रो रखडली गेली.

एलिव्हेटेड रस्ते उभारण्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार

पुणे शहरात विमानतळही 10 वर्षे आधी झाला असता तर पुण्याच्या GDP मध्ये 2 टक्क्यांनी भर पडली असती. पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर विषय आहे. यामुळे या ठिकाणी रिंग रोड आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा निर्माण करण्याची गरज होती. आता पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर पूल तयार करण्याचा प्लॅन नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. यामुळे पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पुणे मेट्रोसाठी जे वन कार्ड

पुणे मेट्रोसाठी जे वन कार्ड तयार करणयात आले आहे. ते कार्ड पीएमपीसाठी पण तयार करता येईल. तसेच या पद्धतीच्या कार्डच्या माध्यमातून देशात कुठेही मेट्रोतून प्रवास करता येईल, असे तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी अजित पवार यांच्या कामांचे देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन कौतूक केले.

सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात.
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी.
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?.
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?.
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.