मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्… थेट डॉनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीला ठार मारण्याचा कट
अमेरीका इराण युद्धाचा परिणाम जगाभारात पहायला मिळत आहे. मात्र यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांचं कुटुंब धोक्यात आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. नेमकं काय घडलं?
अमेरीका इराण युद्धाचा परिणाम जगाभारात पहायला मिळत आहे. मात्र यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांचं कुटुंब धोक्यात आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. नेमकं काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येच्या कथित कटासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या तपास यंत्रणांनुसार, इराण समर्थित दहशतवादी नेटवर्कशी संबंधित एका संशयिताने इव्हांकाच्या हत्येचा कट रचला. इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याकरिता हा कट रचण्यात आला. न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार, 32 वर्षीय मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादीला तुर्कीमध्ये अटक करण्यात आली.
त्यानंतर अमेरिकेत प्रत्यार्पित करण्यात आले. तपास यंत्रणांचा दावा आहे की, संशयिताकडे इव्हांका ट्रम्पच्या फ्लोरिडा येथील घराचा सर्व नकाशा आहे. जिथे ती तिचा पती जेरेड कुशनरसोबत राहते, याशिवाय कट रचणाऱ्यांकडे संवेदनशील माहिती असून शकते. अहवालानुसार, 2020 मध्ये बगदादमध्ये झालेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी मारले गेल्यानंतर संशयिताने ट्रम्प कुटुंबाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला होता.
Published on: May 23, 2026 11:50 AM
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल

