Kabutar Khana : दादर कबुतरखाना हटवण्यावरून राडा, जैन समाज आक्रमक; थेट लावलेल्या ताडपत्रीवर चढले अन्…
कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात. हे कारण वरवरचे असून मुंबईतल्या मोठ्या जागा आणि चौक हडपण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप जैन मोर्चातून करण्यात आला होता. मुंबईतले असे अनेक कबुतरखाने बंद होणार आहेत. याची सुरुवात दादर मधल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या कबुतरखान्यापासून झाली आहे.
दादरच्या कबुतरखान्यावरील महापालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढत विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र आजही कबूतर खाना परिसरात जैन समाज आज आंदोलन करणारे होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळच्या वेळात मोठा जैन समाज दादरच्या कबुतरखाना परिसरात जमला असून पालिकेकडून कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली होती, ती काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि जौन समाजातील आंदोलकांमध्ये मोठी बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून दादर कबूतर खाना बंद करण्यात आला. मात्र, कबुतरखाना बंद केल्यानंतरही मनाई असताना लोकांनी कबूतरांना धान्य टाकल्याचे निदर्शनास आले यानंतर पालिकेकडून कठोर पाऊलं उचलल्याचे पाहायला मिळाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

