पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने गाठलं कार्यालय, पाहणारे पाहतच राहिले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन, सोने आणि खाद्यतेल बचतीचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यावेळी जळगावच्या महापौरांनी चक्क इलेक्ट्रिक बाईकने कार्यालय गाठले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन, सोने आणि खाद्यतेल बचतीचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यावेळी जळगावच्या महापौरांनी चक्क इलेक्ट्रिक बाईकने कार्यालय गाठले.
त्यांनी इतरांनाही जसे शक्य असेल त्याप्रमाणे देशाला सहाय्य करण्याचा आग्रह केला आहे. जळगावातील महिला महापौर दिपमाला काळे यांनी इलेक्ट्रिक बाईकवरून ऑफिसला जात असल्याचे सांगितले. इतकेच नाही, तर त्यांनी त्यांच्या सहकार्यांनादेखील मोठमोठ्या गाड्यांचे ताफे सोडून पर्यावरणपूरक तसेच इंधनाची बचत करणारे पर्याय निवडण्यास सांगितले आहे. त्याशिवाय त्यांनी सांगितले की जर सरकारी वाहनांचा वापर करायचाच असेल, तर शेअरिंग करून यावे. सामान्य नागरिकांनीही कारनेच जाण्यास भाग पडत असेल, तर एकाच कारने चार जणांनी प्रवास करावा. दिपमाला काळे यांनी स्वतः घेतलेल्या पुढाकाराने सगळ्यांनाच चकित केले आहे. अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...

