AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?

ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?

| Updated on: Aug 01, 2026 | 10:16 AM
Share

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत प्रहार पक्षाच्या सदस्या ज्योती शिंदे यांच्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रहार पक्ष हे शिवसेना शिंदे गटाशी संलग्न आहे. त्यांचे मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र छाननीनंतर अवैध ठरवण्यात आले आहे. प्रशासनाने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वावरही कायदेशीर संकट निर्माण झाले आहे.

ज्योती शिंदे यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची कागदपत्रांच्या आधारे तपासणी करण्यात आली. या छाननीत संबंधित प्रमाणपत्र नियमांनुसार वैध नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सदस्यपदाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मराठवाड्यात अवैध किंवा संशयास्पद कुणबी प्रमाणपत्रांवर प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. ज्योती शिंदे यांच्या प्रकरणाचा परिणाम प्रहार पक्षासोबतच शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर शिंदे गटासह अनेक पक्षांतील सदस्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं जात आहे.

Published on: Aug 01, 2026 10:16 AM

Follow Us