Karuna Sharma Video : ‘धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक कराड सारखे अनेक लोकं, लवकरच सर्व आकांची नावं…’, करूणा शर्मांचा खळबळजनक दावा
धनंजय मुंडे यांच्या गँगमध्ये वाल्मिक कराड सारखे अनेक लोक असल्याचा गंभीर आरोप देखील करूणा मुंडे यांनी केला. इतकंच नाहीतर पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत देखील आका आहेत, माझ्याकडे सर्वांचे पुरावे असल्याचा खळबळजनक दावाही करूणा मुंडेंनी केला.
‘कलेक्टर कॅबिनमध्ये धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडकडून मला मारहाण झाली’, असा दावा करूणा शर्मा यांच्याकडून करण्यात आला आहे. तर धनंजय मुंडे यांच्या गँगमध्ये वाल्मिक कराड सारखे अनेक लोक असल्याचा गंभीर आरोप देखील करूणा मुंडे यांनी केला. इतकंच नाहीतर पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत देखील आका आहेत, माझ्याकडे सर्वांचे पुरावे असल्याचा खळबळजनक दावाही करूणा मुंडेंनी केला. शिवाय धनंजय मुंडे यांची राजकीय शक्तीचा वापर करून आका जमिनी, संपत्ती बळकवतात, असं म्हणत करूणा शर्मा यांनी वाल्मिक कराडचं नाव न घेता वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे. लवकरच आकाची नावं सांगणार असं म्हणत करूणा शर्मांनी थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात फरार आहे. त्याची हत्या देखील झाली असावी. वाल्मिक कराडला शरण यायला जर इतके दिवस लागत असतील तर कृष्णा आंधळे याला देखील मारून टाकलं असावं, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. वाल्मिक कराडचे बँकेत 100 खाती आहेत. त्याने बँकेच्या खात्यांमधून पैसा वळवला असेल. धनंजय मुंडे यांच्याकडे आका काही कमी नाही आहेत, त्यांच्याकडे अनेक आका आहेत. माझ्याकडे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अनेक आर्थिक घोटाळ्याची माहिती आहे. वेळ आली तर मी सगळी माहिती बाहेर काढेन, असा इशाराही करूणा शर्मांनी दिला आहे.
Published on: Feb 07, 2025 01:07 PM
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
