उद्या 100 टक्के अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार, करुणा शर्मा काय म्हणाल्या?
मला १०० टक्के याबद्दलची माहिती मिळालेली आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवस आधीच घेतला गेला आहे. वाल्मिक कराड जर दोषी असेल तर मी स्वत: राजीनामा देईन, असे सांगितले होते, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलची मोठा खुलासा केला आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत राजीनामा उद्या होणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. त्यानंतर करुणा शर्मा यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलची मोठा खुलासा केला आहे. मला १०० टक्के याबद्दलची माहिती मिळालेली आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवस आधीच घेतला गेला आहे. वाल्मिक कराड जर दोषी असेल तर मी स्वत: राजीनामा देईन, असे सांगितले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर काहीही राहिलेले नाही. त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांनी घेतला आहे. ते अजून जाहीर का झालेले नाही, याबद्दलची माहिती नाही. पण काल एसआयटी, सीआयडी चौकशीचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे १०० टक्के उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

