सावरकरांविषयी सर्वांनाच आदर पण…; अमोल कोल्हे यांची भूमिका नेमकी काय?
Amol Kolhe on Swatantryavir Savarkar : खासदार अमोल कोल्हे यांनी सावरकरांविषयी आदर व्यक्त केला आहे. सावरकर गौरवयात्रेवरही त्यांनी भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत.. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. “सावरकरांविषयी सर्वांनाच आदर आहे. पण सध्या सावरकरांकडे मुद्दा नेण्यापेक्षा लोकशाहीकडे घेऊन जाण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एननाथ शिंदे सावरकर गौरवयात्रा काढत आहेत. पण त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न सुटणार आहेत का?”, असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईची क्रोनोलॉजी तपासण्याची गरज आहे. मग लोकशाही जिवंत आहे का याचे उत्तर मिळेल, असंही अमोल कोल्हे म्हणालेत.
Published on: Mar 29, 2023 07:34 AM
Follow Us
Latest Videos
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!

