कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य, ओळखपत्रावरून सुरु झालेल्या प्रकरणाचा थरकाप उडवणारा अंत
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातून अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कॉलेज तरुणीवर तब्बल 10 महिने सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातून अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कॉलेज तरुणीवर तब्बल 10 महिने सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 4 आरोपींनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आदित्य शेटके, रणजीत मुधोळकर, प्रणवगिरी पालकर आणि विक्रम पाटील या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी आदित्य शेटके हा व्यवसायाने फोटोग्राफर असल्याची माहिती आहे.
ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. त्याने तिला मुदाळतिट्टा येथे बोलावून मुरगूड तलाव परिसरात नेले. तेथे फोटो काढून ते एडिट करून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. यांनंतर ब्लॅकमेल करुन धमक्या देऊन हाच प्रकरा आरोपीने मित्रांसह 10 महिने केला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच तरुणींना फोटो काढण्याबाबत सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
Published on: Jun 03, 2026 10:27 AM
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
