Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमकं काय घडलं?
कोकणातील विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कोकणातील विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना मिळावी यासाठी तटकरे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असताना या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
दुसरीकडे शिवसेना देखील या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. शिवसेनेकडून विकास गोगावले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून पक्षाने ही जागा आपल्या वाट्याला यावी यासाठी भूमिका घेतली आहे.
यामुळे कोकणातील ही जागा अखेर राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंना मिळणार की शिवसेनेच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान अनिकेट तटकरेंनी या भेटीनंतर पोस्ट केली आहे. या सोशल मिडिया पोस्टमध्ये त्यांनी, विकास कामांसाठी एकनाथ शिंदेंचं मार्गदर्शन खुप महत्त्वाचं ठरतं असं, लिहिलं आहे
Published on: May 31, 2026 10:41 AM
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?