Mumbai | मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीला अखेर मुहूर्त
मुंबईतल्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या पायभरणीला अखेर मुहूर्त मिळालाय. उद्या मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ऊपस्थितीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे या योजनेला हिरवा कंदील दाखवणार आहेत.
मुंबईतल्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या पायभरणीला अखेर मुहूर्त मिळालाय. उद्या मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ऊपस्थितीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे या योजनेला हिरवा कंदील दाखवणार आहेत. सध्या वरळीच्या जांभोरी मैदानात पेंडाॅलचं काम जोरात सुरू आहे. याच पेंडाॅलमध्ये ऊद्या कार्यक्रम आहे. वरळी पोलीस वसाहतीतील 2010 सालापर्यंतच्या पोलिस रहिवाशांना कायमस्वरूपी ५०० फुटांचं घर मिळणार आहे. त्यानंतरच्या पोलिस रहिवाशांना मात्र तिथे घर मिळणार नाही. काही स्थानिकांचा याला विरोध आहे, मात्र सर्वांचा विचार करूनच निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्याने नागरिकांमध्ये ऊत्साहाचं वातावरण आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

