VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 31 March 2022
भाजपच्या नेत्यांना नोटीस पाठवली की, राज्य सरकारकडून अत्याचार होतोय म्हणून कांगावा केला जातो. मात्र, आम्ही काही कुठे बोलले की थेट कारवाई होते. आता या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे. हा अतिरेक थांबवावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. काँग्रेस आणि नाना पटोले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी आज ईडीने धाड टाकली.
भाजपच्या नेत्यांना नोटीस पाठवली की, राज्य सरकारकडून अत्याचार होतोय म्हणून कांगावा केला जातो. मात्र, आम्ही काही कुठे बोलले की थेट कारवाई होते. आता या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे. हा अतिरेक थांबवावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. काँग्रेस आणि नाना पटोले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी आज ईडीने धाड टाकली. उके यांचे सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे, असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय. विशेष म्हणजे लोहिया प्रकरण तसेच निमगडे हत्याकांडप्रकरणी उके हे वकील आहेत.
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो

