‘संजय राऊत हा कुत्र्यासारखा…’, टीकेला प्रत्युत्तर देताना शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
गद्दारी आणि खोकेबाजीच्या माध्यमातून मिळवलेली लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा खोकेबाजीला ऊत आल्याचे संजय राऊत यांनी सामनातून म्हटले. संजय राऊतांवर टीका करताना शहाजी बापू पाटील यांची जीभ घसरली आहे.
‘संजय राऊत हा भुकणारा महाराष्ट्रातला कुत्र्यासारखा माणूस आहे. त्याचा फार विचार करण्याची गरज नाही’, असं वक्तव्य करत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. तर महाराष्ट्राला बौद्धिक दृष्ट्या भडकवणे, फेक नेरेटिव्ह तयार करणे, लोकांच्यात एक भीतीग्रस्त वातावरण तयार करणे आणि काम करत असलेल्या नेत्यांबद्दल कलुषित वातावरण निर्माण करून सत्तेची राजकीय पोळी भाजण्याचे काम संजय राऊत करत असल्याचा आरोपही शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. पुढे शहाजी बापू पाटील म्हणाले, संजय राऊत हा आमदारांच्या मतावर खासदार होत आहे. त्याने नगरपालिकेत साधे नगरसेवकपदाला उभे राहून बघावे, असे म्हणत शहाजी बापूंनी संजय राऊतांना थेट आवाहन केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या सांगोल्यात सभा होणार आहेत, याची मला कल्पना आहे. ते माझ्या विरोधात काय बोलतायत मी जर बोलायला लागलो तर ते येथून पळून जातील. परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंब आहे. त्यामुळे काही मर्यादा आम्ही पाळतो परंतु संजय राऊतवर बोलताना मी कसलीही मर्यादा पाळणार नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

