AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Acharya Devvrat | अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात, पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा निर्धार; राज्यपालांचे अधिवेशनात स्पष्ट संकेत

Acharya Devvrat | अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात, पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा निर्धार; राज्यपालांचे अधिवेशनात स्पष्ट संकेत

| Updated on: Feb 23, 2026 | 12:37 PM
Share

महाराष्ट्र राज्य विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबई येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सभागृहाला संबोधित करत राज्याच्या विकासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भर दिला.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबई येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सभागृहाला संबोधित करत राज्याच्या विकासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भर दिला. राज्याची आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी नागरी तसेच ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य असून भविष्यातही या क्षेत्रात अधिक प्रगती साधण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते, रोपवे, रेल्वे, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण करण्याची गरज असल्याचेही राज्यपालांनी अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भातही माहिती दिली. सरकारने 2 लाख 39 हजार लाभार्थी शेतकऱ्यांकडून 60 लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीन खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इ-राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत अंतरराज्य आणि अंतरबाजार व्यापार सुलभ करण्यासाठी आणि राष्ट्रीय दर्जाच्या बाजारपेठांच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम 1963 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Published on: Feb 23, 2026 12:37 PM

Follow Us
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!