AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra | महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर

Maharashtra | महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची ‘गळती’, धक्कादायक अहवाल समोर

| Updated on: May 03, 2026 | 10:21 AM
Share

अलीकडेच महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय तिजोरीला 32 हजार कोटींची गळती लागल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल कॅग रिपोर्ट्सकडून आला आहे,

अलीकडेच महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय तिजोरीला 32 हजार कोटींची गळती लागल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल कॅग रिपोर्ट्सकडून आला आहे, इतकेच नाही तर ही गळती नेमकी कशामुळे लागली हेदेखील समोर आलं आहे.

कॅग रिपोर्ट्सनुसार, राज्याच्या प्रशासकीय तिजोरीला अनेक वाहनांचा कर थकवणाऱ्यांमुळे मोठे नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. याविषयी आरटीओला थेट सवाल करण्यात आला आहे की, हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवर RTO मेहेरबान का? महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून 10 हजार 352 कोटींची थकबाकी प्रलंबित आहे.

Published on: May 03, 2026 10:21 AM
Follow Us