वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
वनमंत्री गणेश नाईक यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नाजूक असून राज्यावर ₹11 लाख कोटींचे कर्ज असल्याचे म्हटले आहे. राज्यातील 80% भाग दुष्काळाच्या छायेखाली असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागांना 20% खर्च कपातीचे निर्देश दिले आहेत. यावर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रावर सध्या ₹11 लाख कोटींचे प्रचंड कर्ज असून, राज्यातील जवळपास 80% भाग दुष्काळाच्या छायेखाली आहे, असे नाईक यांनी पालघर येथे बोलताना स्पष्ट केले. या गंभीर आर्थिक परिस्थितीमुळे राज्याची स्थिती क्रिटिकल असल्याचे त्यांनी नमूद केले. या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. “मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील,” असे राऊत म्हणाले. तसेच, भाजप आणि शिंदे गटाकडे तिजोरीच्या लुटीतून प्रचंड संपत्ती जमा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना खर्चात कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांच्या निधी खर्चात 20% कपात करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्यास सांगितले आहे. शिक्षण, आरोग्य, कर्जमुक्ती आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांवरील निधीत मात्र कपात केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जलसंधारण, पाणी आणि चारा योजनांसाठी निधी वापरण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
Published on: Oct 18, 2026 05:03 PM
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,

