राहुल गांधी यांची ‘ती’ भूमिका पुरावानीशीच; पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य
Prithviraj Chavan : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आंदोलन करण्यात आलं. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की...
मुंबई : सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावणी आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना जामीनही मंजूर झाला आहे. याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतली ती पुरावानीशी घेतलेली आहे. सावरकरांनी जर त्या ठिकाणी इंग्रजांची माफी मागितली असेल तर त्याचा देखील उल्लेख इतिहासाच्या पानांमध्ये आहे. ते जर राहुल गांधी बोलत असतील तर त्यामध्ये गैर काय?, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य

