Thane Auto Cheaking | RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न, उत्तर नाही आलं तर….15 ऑगस्टनंतर मोठी कारवाई होणार?
मुंबईसह राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अधिक कडक करण्यात आली आहे. रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.
मुंबईसह राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अधिक कडक करण्यात आली आहे. रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. आरटीओ अधिकारी आता थेट रस्त्यावर उतरून रिक्षाचालक आणि वाहनमालकांची चौकशी करत आहेत.
या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांकडून रिक्षाचे कागदपत्रे आणि ड्रायव्हिंग लायसन्सची तपासणी केली जात आहे. याशिवाय चालकांशी थेट मराठीत संवाद साधून त्यांना मराठी भाषा समजते आणि बोलता येते का, याची खातरजमा केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत चालक आणि वाहनमालकांची नोंदणी करण्याचे कामही सुरू आहे.
दरम्यान, परिवहन विभागाने यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास परवाने रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात भाषेच्या अडचणीमुळे अनेकदा वाद निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा परवाना प्रक्रियेतील महत्त्वाचा नियम असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर परिवहन विभागाचा भर आहे. या कारवाईमुळे मराठी न बोलता येणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Published on: May 25, 2026 02:34 PM
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे सरावल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश

