सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तत्कालीन परिस्थितीच्या आधारे आणि कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय दिल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. “कपिल सिब्बल आपल्या अशीलासाठी युक्तिवाद करत आहेत. त्यांना जी बाजू मांडायची आहे, ती ते मांडतील. मात्र, कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे कोर्टाचं मत नाही,” असं नार्वेकर म्हणाले. […]
कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तत्कालीन परिस्थितीच्या आधारे आणि कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय दिल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.
“कपिल सिब्बल आपल्या अशीलासाठी युक्तिवाद करत आहेत. त्यांना जी बाजू मांडायची आहे, ती ते मांडतील. मात्र, कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे कोर्टाचं मत नाही,” असं नार्वेकर म्हणाले. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारे आपण निर्णय घेतला असून, हा निर्णय शाश्वत आहे आणि तो टिकून राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Published on: Aug 18, 2026 10:39 PM
Follow Us
Latest Videos
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल

