12 Board Exam Video : ऑल द बेस्ट पोरांनो… राज्यभरातून 15 लाखांहून अधिक 12वीचे विद्यार्थी, परिक्षा केंद्रावर लगबग
यंदा एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यी बारावीची परीक्षा देत आहेत. तर 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडतेय. या परिक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे. यंदा दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने परिक्षार्थींच्या मनात धाकधुक सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. मात्र परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पठ्ठे परीक्षा देण्यासाठी आजपासून सज्ज झाले आहेत. यंदा एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यी बारावीची परीक्षा देत आहेत. तर 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडतेय. या परिक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. बोर्डाची परीक्षा असल्याने कोणतेही गैर प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर किंवा परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. अशातच आज बारावीचा पहिलाच पेपर असल्याने राज्यभरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळत आहेत. यंदा बारावीच्या एकूण 15 लाख 5 लाख 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली असून यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली तर 37 ट्रान्सजेंडर परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 7 लाख 68 हजार 967, कला शाखेचे 3 लाख 80 हजार 410 आणि वाणिज्य शाखेचे 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. कुठे औक्षण करत तर कुठे गुलाबाचं फूल हातात देऊन बारावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्रावर स्वागत करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Feb 11, 2025 11:23 AM
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
