Solapur | भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री…
भोंदू अशोक खरात प्रकरणातील धागेदोरे अजून सापडत असतानाच आणखी एका भोंदू बाबचं प्ररकरण समोर आलं आहे. या बाबाचे कारनामेदेखील थक्क करणारे आहेत. रिअल इस्टेट एजंट गौतम कसबे याच्याकडून विधीवत पूजेसाठी भोंदू मनोहर भोसले याने 50 हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे
भोंदू अशोक खरात प्रकरणातील धागेदोरे अजून सापडत असतानाच आणखी एका भोंदू बाबचं प्ररकरण समोर आलं आहे. या बाबाचे कारनामेदेखील थक्क करणारे आहेत. रिअल इस्टेट एजंट गौतम कसबे याच्याकडून विधीवत पूजेसाठी भोंदू मनोहर भोसले याने 50 हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशातच आता भोसलेचे नवी मुंबई कनेक्शनही समोर आले आहे.
नवी मुंबईत भोंदू बाबा मनोहर मामा भोसले याचं धक्कादायक कनेक्शन समोर आलं आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये दरबार भरवत, व्हीआयपींना आकर्षित करून तब्बल 51 हजार रुपयांची फी आकारली जात असल्याची माहिती समोर आली आहे. भविष्य सांगणे, अडचणी दूर करणे आणि वाईट शक्तींपासून संरक्षण देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची उकळपट्टी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, या दरबारासाठी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बुवाबाजी प्रकरणात तीन दिवसांपासून अटकेत असलेल्या भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आलिशान आश्रम करमाळा तालुक्यातील घोटी या ठिकाणी आहे .दर अमावस्येला याच ठिकाणी बडी मंडळी आणि राजकीय नेत्यांची गर्दी असायची, या बाबावर आधीही महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.
Published on: Apr 25, 2026 05:55 PM
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं

